Palghar District information in marathi | पालघर जिल्हा माहिती

नवीन जिल्ह्याची मुहूर्तमेढ

एक ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा ठाणे याचे विभाजन करण्यात आले त्यातून पालघर हा आपला नवीन जिल्हा निर्माण झाला महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या 36 झाली.
सर्व कार्य त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्याच वेळचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्याने झाले.

Palghar district map

पालघर जिल्ह्याचा भूगोल

Palghar district information

देश भारत
राष्ट्र महाराष्ट्र
जिल्हा पालघर
जिल्हा क्षेत्रफल ५३४४ sq km.
समुद्र किनारपट्टीची लांबी ११२ किमी
जिल्ह्याची लोकसंख्या (२०११ नुसार) 2990116
जिल्हा साक्षरता दर ६६.६४ %

Palghar District information मराठी मध्ये सांगताना या जिल्ह्याला कोणकोणत्या जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या व केंद्रशासीत प्रदेशांच्या सीमा लागलेला आहे ते बघूया पालघर जिल्ह्याच्या उत्तरेला गुजरात आहे. ईशान्येला नाशिक आहे. दक्षिणेला ठाणे , पश्चिम बाजूला अरबी समुद्र आपल्याला दिसतो आणि वायव्य दिशेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे

पालघरचे साधारण तीन विभाग पडतात. पहिला विभाग म्हणजे डोंगरांच्या रांगा असून तो जंगल पट्टी या नावाने ओळखला जातो. यामध्ये जव्हार मोखाडा विक्रमगड या तालुक्यांचा समावेश आहे दुसरा विभाग बंदर पट्टी म्हणून ओळखला जातो यामध्ये वसई, पालघर, डहाणू हे तालुके येतात तिसरा विभाग सपाटीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो

Palghar jilha या जिल्ह्याला 112 किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे

पालघर जिल्ह्यातील तालुके | Palghar district taluka list

1) पालघर
2) वसई
3) डहाणू
4) तलासरी
5) विक्रमगड
6) जव्हार
7) वाडा
8) मोखाडा

या तालुक्यांचा समावेश आहे पालघर या जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 29,95,420 एवढी आहे.
संपूर्ण माहितीसाठी खालील tabel बघा

Palghar district population

palghar maharashtra population 2021 (२०११)

Taluka Population
Wada 178370
Palghar 550166
Vasai 1343402
Talasari 154818
Vikramgad 137625
Jawhar 140187
Dahanu 402095
Mokhada 83453
Total 2990116
2011 जनगणनेनुसर पालघरची लोकसंख्या

पालघर जिल्हयातील पिन कोड | palghar district pin code

Taluka Pin Code
Wada 421303
Palghar 401404
Vasai 401303
Talasari 401606
Vikramgad 401605
Jawhar 401603
Dahanu 401602
Mokhada 401604
Palghar District pin code

पालघर जिल्ह्याचा इतिहास | History Of palghar

पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना इतिहासाचा वारसा लाभलेला आहे वसई तालुक्यावर पूर्वी पोर्तुगीजांचा कब्जा होता त्यावेळी त्या काळामध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांचे हे साम्राज्य उध्वस्त करून लावत जवळपास पावणे तीनशे वर्षांपूर्वी मराठी झेंडा वसईमध्ये रोवला.

तर जव्हार येथील मुकणे राजे हे खूप प्रसिद्ध राजे होते, त्याच्या राज्याला शिवाजी महाराजांनी सुद्धा भेट दिली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942 च्या चले जाओ या आंदोलनामध्ये पालघर हे सर्वात महत्त्वाचे केंद्र होते ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात 14 ऑगस्ट 1942 रोजी उठाव झाला होता त्यात पालघर हे उठावाचे मुख्य केंद्र होते. या उठावा मध्ये पालघर तालुक्यातील पाच हुतात्मा शहीद झाले होते.

त्यामध्ये सातपाटीचे काशिनाथ पागधरे, नांदगावचे गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र तिवारी, मुरबे येथील रामचंद्र चोरी, शिरगावचे मोरे युद्धात स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देताना शहीद झाले या शहीदांना स्मृती आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाला मानवंदना म्हणून पालघरमध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे आहे.

Palghar District information देताना या गोष्टीचा उल्लेख करताना अभिमान वाटतो

पालघर जिल्ह्यामधील संस्कृती | Culture of Palghar

पालघर येथील आदिवासी समाजाने आपला परंपरागत सांस्कृतिक वारसा जपला असून त्यामधील वारली चित्रकला आणि तारपा नृत्य ही समाज जीवनाची ओळख आहे. आणि त्यातील वारली चित्रकला ही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे

Tourist Places in Palghar | पर्यटन व धार्मिक स्थळे

जिल्ह्यात अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत चला तर पाहूया ती कोणती आहेत

जर तुम्हाला c19 travel request from palghar किंवा पाहिजेत असेल तर खालील लिंक वर जा


धार्मिक स्थळे | temples in Palghar

1) जीवदानी देवी मंदिर ( विरार )
2) महालक्ष्मी मंदिर (डहाणू)
3)संतोषी माता मंदिर आशागड( डहाणू)

पालघर जिल्ह्यातील किल्ले | Forts in Palghar

1) कोहोज किल्ला ( वाडा )
2) केळवा किल्ला
3) शिरगाव किल्ला (पालघर)
4) अर्नाळा किल्ला
5) वसई किल्ला
6) गंभीरगड (डहाणू)
7) तारापूर किल्ला
8) काल दुर्ग किल्ला पालघर

पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे | Beach in Palghar

1) केळवा समुद्र किनारा
2) अर्नाळा समुद्रकिनारा
3) चिंचणी समुद्रकिनारा (डहाणू)
4) डहाणू बोर्डी समुद्रकिनारा
5) आलेवाडी समुद्रकिनारा
6) माहीम समुद्रकिनारा
7) नांदगाव समुद्रकिनारा
8) सातपाटी समुद्रकिनारा
9) शिरगाव समुद्रकिनारा
10) जाई समुद्रकिनारा

इतर महत्त्वाची ठिकाणे | Other places

  1. जव्हार राजवाडा
  2. कालमांडवी धबधबा
  3. सनसेट पॉइंट (जव्हार)
  4. शिरपामाळ
  5. धामणी बंधारा
  6. खड-खड बंधारा

पालघरमधील प्रमुख शेती उत्पादने : भात, कडधान्य, आंबा, मका, मिरची, उडीद, डहाणू चा चिकू, वसईची केळी पालघर जिल्ह्यातील मुख्य उत्पादने आहेत

जिल्ह्यातील नद्या: पालघर जिल्ह्यात वैतरणा नदी ही एक मुख्य नदी आहे व तानसा नदी, सुर्या नदी, देहर्जे नदी , पिंजाळ नदया नदीच्या उपनद्या आहे

वैतरणा नदीचे उगमस्थान हे नाशिक मधील त्र्यंबकेशवरमध्ये ब्रम्हगिरी पर्वतावर आहे.

ठळक वैशिष्ट्ये

• वीज निर्मिती करणारा पहिला अनु उर्जा प्रकल्प पालघर येथील तारापूर या ठिकाणी आहे (अप्सरा अणुभट्टी)

• पालघर जिल्हा वारली चित्रकला साठी प्रसिद्ध आहे आणि या वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर नेणारे जिव्या सोमा म्हसे यांना 2011 मध्ये पद्मश्री दिला गेला

• पालघर जिल्ह्यातील लोकांनी आपले वारली चित्रकला आणि तारपा नृत्याची सांस्कृतिक परंपरा अजूनही जपलेले आहे

•आपल्या जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील चिकू भारतात सुप्रसिद्ध आहे

•आपल्या जिल्यातील वसईची केळी ही पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत

• वारली चित्रकलेमध्ये निसर्गातील विविध वस्तू सण-उत्सव अनेक प्रसंग दाखवले जातात निसर्गामध्ये मिळणार या वनस्पतीपासून तसेच माती तांदळाचे पीठ रंग तयार केले जातात कुठलाही रासायनिक पदार्थांचे किंवा रंगांचे मिश्रण याच्यामध्ये नसते तसेच हे चित्र काढण्यासाठी बांबूच्या काठ्यांचा वापर केला जातो तसंच ब्रश करून चित्र काढले जातात हे वारली चित्रकलेचा वैशिष्ट्य आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळतात.

सध्याचे (२०२१) palghar deputy collector Dr. Manik Gursal (I.A.S) हे आहेत

Conclusion

पालघर हा जिल्हा निसर्गाने नटलेला आहे. येथे पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे जसे की किल्ले, समुद्रकिनारे, धबधबे, मदिरे आहेत. त्यामुळे येथे ट्रॅव्हल करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एक दिवस नक्कीच पालघर हे महाराष्ट्रातील मोठे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: