ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे ? | Difference between blog and website in marathi

ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे (difference between blog and website in marathi): जर तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईट बनवण्याचा विचार करत आहात आणि तुम्हाला समजत नाहीये की ब्लॉग बनवावा की वेबसाईट ? तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाईट मधील फरक (difference between blog and website) माहिती नाहीये. तर तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा ! या पोस्टमध्ये तुमच्या ब्लॉग आणि वेबसाईट संदर्भातील सर्व समस्या दूर होतील.

ब्लॉग म्हणजे काय ? (What is blog in marathi)

जर तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय माहिती नसेल तर त्यावर मी अगोदरच एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. जी वाचल्यानंतर तुम्हाला सहज समजून येईल की ब्लॉग कशाला म्हणतात. वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही ती पोस्ट वाचू शकता .

ब्लॉगची संकल्पना वेबसाईट पेक्षा थोडी वेगळी आहे. ब्लॉग हा स्वतंत्रपणे किंवा २-४ लोकांच्या समूहाने तयार केला जातो. लोकांना माहिती आणि ज्ञान देणे हा ब्लॉगचा मुख्य हेतू असतो. ब्लॉगमध्ये लगातार माहितीने भरलेली पोस्ट publish केल्या जातात. ब्लॉग बनवण्यासाठी आपल्याला कोडिंग येण्याची आवश्यकता नसते. शिवाय ब्लॉगमध्ये मोफत themes आणि templates उपलब्ध असतात.

ब्लॉग बनवण्यासाठी इंटरनेटवर अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की blogger, wordpress, weebly, tumblr, medium, इत्यादी. यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही मोफत ब्लॉग बनवू शकता. पण blogger आणि wordpress हे दोन प्लॅटफॉर्म ब्लॉग बनवण्यासाठी सर्वात उत्तम आणि विश्वसनीय मानले जातात. जवळपास ८०% लोक या दोन प्लॅटफॉर्म चा वापर करतात.

ब्लॉगची वैशिष्ट्य काय आहेत (specifications of blog) :

 • ब्लॉग हा महितिचा भांडार असतो
 • ब्लॉगमध्ये लेखकाला प्रश्न, शंका, समस्या विचारण्यासाठी commenting system असते
 • ब्लॉग मधील सामग्री किंवा माहिती वेळेनुसार आद्यावत (update) केली जाते
 • ब्लॉगमध्ये guest post ची सुविधा देखील उपलब्ध असते
 • ब्लॉगमध्ये chronological listing असते जेणेकरून लेखकाने लिहिलेल्या नवीन पोस्ट ब्लॉगमध्ये सर्वात वरती दिसतात आणि जुन्या पोस्ट खाली दिसतात
 • ब्लॉगमधून पैसे देखील कमावले जाऊ शकतात.
 • लेखनाचा छंद जोपासण्यासाठी ब्लॉग हा एक उत्तम नमुना आहे

Website म्हणजे काय (what is website in marathi)

वेबसाईट एक web pages चा संग्रह असतो ज्यामध्ये homepage हा मुख्य पेज असून त्याला इतर वेब पेज जोडलेले असतात.

वेबसाईट खास करून एखादा buisness किंवा कंपनीसाठी बनवली जाते आणि या वेबसाईटचे एक खास उद्दिष्ट असते. या वेबसाईट मध्ये जास्त करून त्या कंपनी बद्दल माहिती दिलेली असते जसे की कंपनीचा पत्ता, contact number, email, contact form, इत्यादि.

त्याचबरोबर वेबसाईट मध्ये buisness किंवा कंपनीच्या प्रॉडक्टची ऑनलाईन मार्केटिंग केली जाते. जर की तुम्हाला amazon, flipkart, club factory सारख्या buisness websites माहिती असतील.

आपले Government देखील खूप जास्त प्रमाणात वेबसाईटचा वापर करते. जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड आदी दस्तावेज बनवण्यासाठी सरकारची UIDAI Website आहे. जेथे की आपण आधार कार्ड, पॅन कार्ड सारखे दस्तावेज बनवू शकतो तसेच त्यांना update करण्यासाठी अर्ज देखील करू शकतो.

शिक्षण आणि सरकारी योजना यासाठी देखील वेबसाईटचा खूप उपयोग होतो. तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक शैक्षणिक विद्यापिठाच्या एक स्वतंत्र वेबसाईट असते जेथे की विद्यापीठातील सर्व परीक्षांचे वेळापत्रक, सूचना, गुणपत्रक घोषित करण्यात येते. जसे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ची unipune.ac.in वेबसाईट आहे.

वेबसाईटचे वैशिष्टय (specifications of a website):

 • वेबसाईट buisness किंवा एखाद्या कंपनीसाठी बनवली जाते. Personal वेबसाईट देखील बनवली जाऊ शकते
 • वेबसाईटचा लूक खूपच आकर्षक आणि प्रोफेशनल असतो
 • यात तुम्हाला sign up किंवा log in करण्याची आवश्यकता असू शकते
 • वेबसाईट मध्ये homepage हा मुख्य पेज असून त्याला इतर पेज लिंक केलेले असतात
 • वेबसाईट मध्ये कंपनीचा पत्ता आणि माहिती उपलब्ध असते
 • वेबसाईट मधून प्रॉटडक्टची ऑनलाईन मार्केटिंग केली जाते
 • वेबसाईट मधून customer base तयार करण्यासाठी देखील उपयोग होत असतो
 • कंपनी सोबत संपर्क साधण्यासाठी contact form दिलेला असतो

ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक आहे ? (Difference between blog and website in marathi)

ब्लॉग ही देखील एक प्रकारची वेबसाईट च असते. दोन्हींमध्ये फक्त एवढाच फरक आहे की ब्लॉगमध्ये अद्यावत सामग्री असते आणि वेबसाईट एक web pages चा संग्रह असतो ज्यामध्ये homepage ला इतर पेज लिंक केलेले असतात. वेबसाईट या नेहमी स्थिर असतात. पण ब्लॉग हा नेहमी सक्रिय असतो, ब्लॉगमध्ये नियमित पोस्ट टाकल्या जातात.

ब्लॉग आणि वेबसाईट दोन्हींमध्ये काय बनवणे योग्य आहे ?

या प्रश्नाचे उत्तर देणे खूपच कठीण काम आहे कारण ब्लॉग आणि वेबसाईट दोन्हींमध्ये वेगवेगळी वैशिष्टय आहेत. दोन्हींमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत.

तरी देखील तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाईट दोन्हींमध्ये काय बनवणे योग्य ठरेल ? (Difference between blog and website in marathi) हे जाणून घ्यायचे असेल तर ते तुमच्यावर निर्भर करते की तुम्हाला कोणत्या कामासाठी बनवायचे आहे. ब्लॉग किंवा वेबसाईट बनवण्यामागे तुमचे काय उद्दिष्ट आहे.

जर तुमचा एखादा buisness किंवा कंपनी आहे आणि तुम्ही वेबसाईट बनवून तुमचा buisness वाढवण्याचा विचार करत आहात, तुमच्या buisness किंवा कंपनीची माहिती इतरांना द्यायची आहे, तुम्ही employees शोधात आहात, तुमच्या प्रॉडक्ट ची ऑनलाईन मार्केटिंग करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक वेबसाईट बनवणेच योग्य राहील. या सर्व सुविधा तुम्हाला एका वेबसाईट मध्ये मिळतील.

जर तुम्हाला लेख लिहायला आवडतात, तुम्हाला तुमचे विचार , माहिती जगातील लोकपर्यंत पोहचवायची आहे, ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत तर तुमच्यासाठी एक ब्लॉग बनवणे योग्य राहील. तुम्ही ब्लॉग बनवून हे सर्व कामे करू शकाल. तुमच्या लेखन कौशल्याने ब्लॉगींग क्षेत्रात तुमचे नाव कमावू शकता.

तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाईट मधील फरक (difference between blog and website in marathi) लक्षात आला असेल. आता तुम्हाला ब्लॉग तयार करावा की वेबसाईट? कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बनवू शकता.

ब्लॉग आणि वेबसाईट दोन्हींमध्ये काय बनवणे सोपे आहे ?

वेबसाइट तयार करण्यापेक्षा ब्लॉग तयार करणे खूप सोपे आहे. ब्लॉग तयार करण्यासाठी इंटरनेटवर बर्‍याच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे आपल्याला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देतात. यात आपल्याला बर्‍याच विनामूल्य टेम्पलेट्स मिळतात ज्याद्वारे आपण आपल्या ब्लॉगला व्यावसायिक स्वरूप देऊ शकता.

ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला कोडींगची देखील आवश्यकता नाही, जो सामान्य माणूस बनवू शकतो.

वेबसाइट्स तयार करणे एक कठीण काम आहे. ते तयार करण्यासाठी आपल्याकडे Html, javascript, css यासारख्या प्रोग्रामिंग भाषा अवगत असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोडिंग बद्दल ज्ञान नसल्यास तुम्हाला तुमची website एखाद्या web designer कडून बनवून घ्यावी लागेल, यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील.

ब्लॉग आणि वेबसाइटमध्ये काय समानता आहे?

 • ब्लॉग आणि वेबसाइट दोन्हीमध्ये आपल्याला डोमेन आणि होस्टिंग आवश्यक आहे.
 • दोघांचा स्वतःचा वेब पत्ता आहे ज्यास url देखील म्हणतात
 • दोघेही लोकांना मदत करतात
 • दोन्हीमध्ये आपण मजकूर फायली, ऑडिओ-व्हिडिओ गाणी, पीडीएफ फायली, फोटो, कागदपत्रे इत्यादी ठेवू शकतो.
 • ब्लॉग प्रमाणेच वेबसाईट मधून देखील digital marketing, affilliate marketing करून पैसे कमावता येतात
 • लेखक आणि कंपनीशी संपर्क साधण्यासाठी दोघांचा संपर्क फॉर्म आहे.
 • दोघांचे स्वतःचे गोपनीयता धोरण आहे

आपण काय शिकलो ?

मंडळी आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये काय फरक असतो म्हणजेच blog आणि website मधील फरक (difference between blog and website in marathi) बद्दल माहिती दिली.

तसेच या पोस्टमध्ये ब्लॉग म्हणजे काय, वेबसाईट म्हणजे काय यावर देखील चर्चा करण्यात आली. मला आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडली असेल, धन्यवाद…!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: