मराठी चारोळ्या | Best Marathi Charoli | Marathi Charolya

Marathi charoli:- नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहास मी आशा करतो की आपण सर्व चांगले आहात जर आपण Marathi charoli शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहात, मि या लेखात Marathi charolya आपल्याशी Share करणार आहे, जे मला आशा आहे की आपल्याला आवडेल, जर आपल्याला स्टेटस वाचण्याची आवड असेल तर आ पण या वेबसाइटवरचे स्टेटस वाचले पाहिजेत, मला उम्मीद आहे की आपल्याला हे सर्व लेख आवडतील।

Marathi charoli | Marathi charolya | Comedy | Life | Funny

कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात

जगात चाललेल्या अन्यायाविरुद्ध
काहीतरी करायचे म्हणून
त्यांनी घेतले फक्त
आपले डोळे घट्ट मिटून ….

ना बोनस ना भत्ता
भीक मागते सत्ता,
लालदिवे बाकी अन
सरकार बेपत्ता.

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

वयाच्या साठीनंतरही अमेरिकेत स्त्रिया
पुरूषांना Divorce देतात.
वयाच्या तिशीतही आमच्याकडच्या बायका
Divorce हा शब्द्व ऐकूनच फीट येऊन पडतात.

आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.

नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.

पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने

पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….

पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.

मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून

रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता

“खरच तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही ……
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!”

“मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!”

Charoli in Marathi

“या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!”

“हळूच चालत तुझ्या रूपाने
नशीब येईल दारी …
मला न कळता अशी अचानक
घडेल किमया सारी “

‘तुझ्या माझ्या’ “मैत्रीत” काय “गुपित” लपलय
तुझ्या माझ्या “मैत्रीने” फकत आपलेपण जपलंय
“नात्यांचे” स्नेह बांध कोण शोधत बसलय
“जीवा” पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय

Out dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना ‘virus’ लागलाय
दु:खं send करता येत नाही

computer च्या chip सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन ‘mother’ नावाचा board,
त्याच्या आयुष्यातून वजा झालाय..

floppy Disk Drive मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
अन फाटली मनं सांधणारा
internet वर धागा नाही

hang झालेय PC सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही websit..

अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.

अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळण
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणे..

अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले…. 🙂
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..

अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नांना
तू कधी उत्तर दिले नाही….

अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस

अजून आठवे ती रात पावसाळी,
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली…
जरा स्पर्श होता सुटे कंप हाती,
नको बंध आता अशा धुंद राती…

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…

अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?

अडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…

अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..

अमृत समान आहे आईचे स्वरूप
त्यात सामावले विश्वरूप
तरी ती आहे मांगल्य रूप
तरी बनावे तीर्थरूप

Marathi charolya comedy

अर्जुनाला जेव्हा
प्रश्न पडला युद्धाचा
तेव्हापासून महाभारत
विषय बनला श्रध्देचा

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..

अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काही काळ का असो
माझ्या खांद्याचा तू आधार घेतला होतास

अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही

अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…

अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली…

अशी एक बायको हवी
तोंड हे अंग नसलेली,
अशक्यातली गोष्ट आहे पण
देवाने आशा नाही सोडलेली.

अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते!

असं कधीच नाही होणार ,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला ,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

असे नाते बनवा की, त्याचा
अंत केव्हाच नसावा…
प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश
शेवटपर्यंत असावा…

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा,
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा.

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे.

असेल कुणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारा..
माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..

आंबा खाताना
लिहित होतो चारोळी
ठसका लागला आणि
घशात अड़कली आठोळी

आंस तुला संपण्याची जरी
मज आंस तुला बघण्याची
जळतो जरी विरहात तरी
मी बघतो तुला दुरुनी

आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…

आकाशभर ढग भरूनही,
पावसाचं आगमण लांबलेलं…
तुझं येणं नसलं तरी,
मन वाट पाहात उगाच थांबलेलं…

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…

marathi charolya maitri sms

आज एक चूक घडली,
ती माझ्यावर चिडली,
स्वतः बनून अबोली,
गजरा मात्र विसरली.

आज काल वाटेवरचा
मोगाराही नेहमीसारखा फुलत नाही,
कदाचित त्याला ही समजलं असेल,
की तू माझ्याशी बोलत नाही.

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट,
चिंब चिंब भिजली होती..
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती..

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…

आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस…

आज तुझ्यासाठी लिहिताना
शब्द अपुरे पडत आहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी
शब्दच शब्द शोधत आहेत.

आज निवडून आले आहेत इथे,
जुन्या राजकारणातले नव-नवीन उमेदवार…
पाच वर्ष दबा धरणार म्हणून,
खुर्चीलाही वाटू लागलाय आत्ताच त्यांचा भार !

आज परंतु सन्मानाने
सारे त्याला खाऊ घालती
वर्षाकाठी फक्त काही दिन
पूर्वज आपले त्यात पाहती..

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,
पण तुला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

आज पाऊस पण
बेफाम कोसळत होता…
आणि
मी पण भिजत होतो
मनसोक्तपणे तिच्या आठवणीत….

आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…

आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती

आज मला एक चांदणी ,
तुझ्यासारखीच भासली…
मला पाहून हळूच ,
गालातल्या गालात हसली…

आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तूझंच नाव येतय
माझ्या प्रत्येक ओळीत…

आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर…..
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर……

आजकल प्रेम तुझं
आधीसारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही …

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही..
बोललेल कोणाला आवडत नाही..
जवळ असलेलेच मग दूर होताना..
क्षणाचाही विचार करत नाही..

आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले……….
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले….

आजमावून बघ हवं तर ,
प्रेम माझं खरं किती…
पण तूलाही प्रेम तुझे ,
द्यावे लागेल त्याआधी..

आजही मन जागत होते
तुझ्या येण्याच्या आशेवर
आणि डोळे लागुन राहिले होते
तुझ्या येण्याच्या वाटेवर

आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..

आठवण तुझी आली की, आपोआप
पाऊले तुझ्याकडे वळतात…
मी फक्त चालत राहतो, ते मला
बरोबर नेऊन सोडतात…

आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहते..
जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील.

आठवणी विसरता येतात,
पण प्रेम नाही विसरता येत…
मग तू मला कशी विसरलीस…

Marathi charolya Kavita

आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

आठवणी हसवतात आठवणी रडवतात..
काहीच न बोलता आठवणी निघून जातात..
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात…

आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

आठवणींच्या मागे धावलो
कि माझं असचं होतं.
आठवणीं वेचत जाताना,
परतायचं राहुन जातं.

आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला इतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
खोटे हासु आणायचे तरी कसे?

आठवणीच्या हिंदोळ्यावर
तुझे माझे भेटणे
एकांती पावूल वाटेवर
तुझ्या आठवणीतच माझे चालणे

आठवणीत तू नजरेत तू,
ओठावरही तु्झेच नाव,
तुझ्यावर प्रेम करतो,
सागर माझे नाव।

आठवावं तुला अन् ,
समोर तूझं येणं व्हावं …
त्याहून सुंदर असं ,
दुसरं काय आणि हवं .

आता तरी हो बोल..
तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..
कसं सांगू तुला सजनी
तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल

आता माझ्या हृदयातच तु
आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु
आठवणारच ना..

आता राहवेना मुळीच
कसे सांगू हे तुला ?
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला…

आधीच नाक तुझं एवढे एवढे,
त्यावर रागाचे ऒझे केवढे.
नजर तर अशी करारी,
कि काळजाला नुसते जखमांचे धडे

आन्तरीचा भावन्नाना
शब्दाची गरज नसते.
निशब्द नजरेला ओळखण्याचे
सामर्थ्य मात्र लागते…….

आपण घालवलेला एकही क्षण
विसरायला सांगू नकोस ……
तुला विसरणारे असतील हि
त्यात मला मोजू नकोस !!!”

आपली पहिली भेट.. नवी ओळख..
एक सुगंध मनात ठेऊन गेली.
तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण,
तरी एक बंध मनात ठेवून गेली.

आपली पहीली भेट अशी
त्रिखंडात दुमदुमत राहील
आपल्या मैत्रीचा डंखा
अखेरपर्यंत घुमत राहील

आपले म्हणूनी आता ,
कोणास हाक मारु…
आपल्यांनीच सतावले इथे ,
परक्यांशी काय भांडू…

आपल्याला काही हव असणं
म्हणजेच आपलं जगणं आहे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे
आपलं काही मागण आहे.

आपल्याला प्रेम करता येते
कोणताच तेढ न ठेवता
मग आपण ते व्यक्त का करत नाही
कोणतेच आढेवेढे न घेता ?

Marathi charolya funny

आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं

आभाळ भरून येतं म्हणजे
अगदी कानाकोपरा भरतो
तरी तुझ्या आठवणीसाठी
एक ठिपका उरतो…

आमची मैत्री समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…

आयुष्य असं उधळू नकोस
जरी एकरुप तु माझ्याशी
मलाही वेळ चांगला घालवायचा आहे
मैत्री करून मनापासून तुझ्याशी

आयुष्य कसं असत
बाभळीच्या पालवी सारखं,
काट्यातच फुलणार
अन काट्यातच विरणार..

आयुष्य माझे फुलण्यासाठी
तुझा श्वासोश्वास झाला
तुझ्यासाठी तर मी
हवेतला प्राणवायूही त्यागला

आयुष्य हे तुझ्याशी बांधलेले ,
मन असे प्रीत सरीत भिजलेले ,
माझे मी पण कुठे उरले सख्या
कसे जपू परिस मज गवसलेले ?

आयुष्याचे क्षण म्हणजे
पाणी अलवावरचे
रित्या मनाची करून ओंजळ
जमतील तितके वेचायचे..

आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण
तुझी येत राहील..
अलगद असा पापण्यांवरुन
अश्रु एखादा ओघळुन जाईल…

आयुष्यात झालेली जखम,
कधितरी भुलवावी लागेल……
तुलाही आता, आयुष्याची
नवीन सुरुआत करावी लागेल…..

आयुष्यातील सारे दुःख
या डोळ्यांसमोर फिके आहे
कारण आता नजरेसमोर
तुझ्या आठवणीचेच धुके आहे

आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा …

आवडत्याला आवडतं म्हणायचंय….
नावडत्याला नावडतं म्हणायचंय….
खोट्यात घुसमटून कंटाळलाय जीव….
जरा मोकळं मोकळं व्हायचंय…

आवडली असेल जर तुला
तर तुही थोडी दाद द्यावी,
तुझ्यामुळेच लिहिली गेली आहे
म्हटला चला.. कविमनाला थोडी वांट द्यावी

आसवांची फुलेच दिलीस मला तु
मौन राखिले तरी
का डोळ्यात तुझ्या सदा प्रश्नभाव
राजसा प्रीत माझी हि खरी..

आहे मनात प्रेम पण व्यक्त
कसे करू कळत नाही,
तु भेटताना शब्द होतात मुके
मनाला बोलताच येत नाही

आहेस तू सोबतीला
म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त
तुझाच ध्यास आहे..

उगाचच खूप उत्तरे द्याला लागतात,
कधी कधी वेड्यासारखे वागल्यावर…
पण खूप वेड्यासारखे वागायला होत मला,
पहिला पाऊस पडल्यावर…

उडोणी एक फुलपाखरु,
तुझ्यापाशी आले …
तू ही एक फुल, बहुदा
त्यालाही कळाले …

उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…

Marathi vinodi charolya

एक उपेक्षित पक्षाचा का
आज अचानक भाव वाढला
सर्वच त्याची वाट पहाती
चमत्कार हा कैसा घडला

एक झलक पुरेशी असते मला
तुझ्या आठवणीत दिवस काढ़ायला….
तीच तर देते पून्हा उर्जा
त्याच वाटेवर तुझी आस लावून बसायला….

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

एक दिवस तरी सुख ,
धावून माझ्याकडे येईल …
दुःखाशी लढण्यास ,
माझ्या बाजूने होईल ..

एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे

एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..

एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करून बसेल…

एकही क्षण नाही जेव्हा
तिची आठवण येत नसेल,
असा एकतरी क्षण असेल
जेव्हा ती मला आठवत असेल

एकांताला सोबत घेऊन
समुद्र किना-यावरुन चालताना,
वाळुनेही जागा सोडावी पाया खालुन ?
लाट माझ्यापासुन ओसरताना…!!!

एवढ्या तेवढ्यानं होत असत
तर मी तेवढच केल असत
पण माहीत आहे मला ते तेवढ
जन्मभर पुरल नसत..

ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..

ओघळणारे अश्रू कधी
जिकंत वा हरत नाहीत,
भावनाच रडतात सार्‍या
आठवणी कशा सरत नाहीत?

ओठ माझे तुझ्या ओठांवर ,
येऊन विसावतात…
ते क्षण एकांतात आठवले ,
तरी लाजवतात…

ओठांनी अबोल असली
तरी डोळे खुप काही बोलायचे
मनातील वादळ नकळत
खुप काही लपवायचे

ओले त्या धुंद क्षणांची
सर आठवणींची ओली
ओंजळीत मी धरलेला
पाऊस तुझा मखमली…

ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…

कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हि त्याच्यावरच विश्वास ठेवतो

Marathi charolya images

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही

कधीच फिरकत नाही आजकाल
आठवणीच्या त्या गावाला…
ज्यांच्या आठवणी शिल्लक आहेत तिच
माणसं आहेत आता नावाला…

कधीतरी माझेही आयुष्य
तुझ्या प्रेमाने उजळेल
माझ्या प्रीतीचे चांदणे
तुझ्याही डोळ्यातून विरघळेल

कमी समजू नको प्रेमाला ,
रागवलो मी जरी…
रागवण्यामागेही माझ्या ,
काळजीच असते गं तुझी…

कळत नकळत आयुष्यात
खुप काही घडून जाते
अलवावरचे पाणी देखील
अलगद ओघळून जाते

कळलचं नाही कधी मला
तुझं ते आतल्या आत जळण
जवळ असून ही लक्ष्यातच आल नाही
तुझं एकटीचच तडफडणं..

कविता एक निवारा आहे
तुझ्या माझ्यासारख्यांचा
कृष्ण होता आवडता
निरनिराळ्या सख्यांचा

कवितांच्या दुनियेत
किती मजा असते,
एकट एकट वाटताना
अख्खी दुनिया बरोबर असते….

कसे करू माफ़ तुला
जे घाव तू मला दिले……
घेऊन माझी फूले
तू काटेच मला दिले……

कस्तुरीच्या गंधासाठी
मृग चहूकडे धावत असतो…
स्वतःकडेच लपलेल्या या गंधाचा
त्याला मात्र थांगपत्ता नसतो…

का आठवणीत ही येते सये
तू नेहमी हसरा चेहरा घेवून,
नुसत्या आभासातून हि जातेस
माझ्या चेहऱ्यावर हास्य ठेवून…

का कसे कुणाचे तरी मन कुणावर तरी जडते?
मग फक्त तिचेच स्वप्न रोज भल्या पहाटे पडते.
आता मोहक तिचे रूप माझ्या रोजच्या आठवणीतले,
नि रोजचे हे शब्दाश्रू माझ्या मनांतल्या साठवनितले.

का काय माहिती माझ्या भावना
तुला कधीच उमगत नाही…
त्या भावनांमध्ये माझे किती प्रेम
दडलंय हे तुला कधी कळलच नाही…

का तुझ्या माझ्या नात्याला ,
प्रेमाचे नाव द्यावे …
नुसतं नावानेच काय त्याला ,
प्रेमाचे भाव यावे …

काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो..

काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि
जरा जगावसं वाटले…

काही नको मला
फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी..

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

किती दारंग स्वप्नांचे
निजेवर सांडणे व्हावे . . !!
तिने बेचैन होतांना
कळ्यांनी श्वास टाकावे !!

किती नाव ठेवली तरी
परिस्थितीत बदल होणार नाही
पेरणीचा मौसम गेल्यावरही
पाऊस काही येणार नाही

Marathi charolya SMS

किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही..
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही…

किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जीवनाची

किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा…

कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही…,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

कुंपनाच्या बंधनाचे जाळे
असे असो की,
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली
मला जन्मोजन्मी मिळो..

कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होऊन पाहतो..

कुठे तरी, काही तरी घडलय
त्याचं कोणासोबत तरी बिनसलय
मग उगाचच नाही मन माझं
माझ्यापसुन दुर गेलय….

कुणीतरी आपली आठवण काढतंय,
असं सारखं वाटतंय…
म्हणूनच की, काय आजकल उचकीचं
येणंही खूपच वाढलंय…

कॉलेजमध्ये कुणी नाही पटली
तर गल्लीत आपली ‘मालू’ आहे
कट्ट्यावरचा प्रत्येक जणच तसा
थोडा बहूत चालू आहे….!

कोण म्हणते तुझ्या कुरूप चेहऱ्यामुळे
कोणीही प्रेम करत नाही तुझ्यावर ,

अगं वेडे माझे प्रेम आहे ना
तुझ्या सुंदर अशा मनावर ….

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…

कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे?

कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु सोंजळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.

कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……

क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्‍यास असतो तुझ्याच मनात

क्षण सरून गेलेले
आज आठवती पुन्हा
जुण्या आठवांची जखम
देई दर्द पुन्हा पुन्हा..

क्षणात होत उदास मन
कस काही बोलत नाही?,
स्वप्नात ते हरवून जातं
त्या आठवणिं संपत नाहीत

Marathi charoli images

खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी
आपल्याच विश्वात रमणारं!

खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…

खरी जरी असेल प्रित तुझी…
का केली नाही तु व्यक्त…
सदा वाट बघण्यात तुझी…
आटले माझ्या देहाचे रक्त..

खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,

खुणवीत आहे काही
तिळ तुझ्या गालावरचे,
मलाच समजत नाही
ते शब्दात कसे सांगायचे.

खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…

खूप लोकं भेटली मला
आपलं आपलं म्हणणारी…
पण फारच कमी माणसं होती
ते आपलपण टिकवणारी…

गणिताच्या तासाला बसणं
हि जरी माझी सजा आहे
नवीन madam ला पाहत बसणं
यातही थोडी मजा आहे .

गरजेपुरते गोड बोलणारे
तसे मला हजार भेटले…
मला गरज पडताच,
माझे सारेच प्रसार झाले.

गालावरची खळी पड़ते
डोळ्यात तुझे स्वप्न रंगवतो
का बरं असा मी
स्वताला तुझ्यात गुंतवतो

गुंतलेले क्षण तुझे माझे
पानावर थांबल्या दवाबिंदुंचे
ओंजळीत सारे भरायचे
अन एकमेकांत रुजवायचे..

गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,

घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर “वेल-कम”चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?

घनघोर ह्या डोळ्यात
भाव गहन आसुसलेले
शब्दांतल्या साठव्यात दडून
ओठान्वर ओथांबलेले

घराभोवती कुंपण नको
म्हणजे नीट आत जाता येते
बायकोनं नाही उघडलं दार
तर पायरीवरच झोपता येते

घरी असताना
नवरा बायकोशी बोलत नाही.
ऑफिसमध्ये पोहचल्यावर फोनवरून “हाय डार्लिंग”
म्हटल्याशिवाय त्याला राहवत नाही..

घेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो…
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो…

घेता तुज जवळी एकदा
लक्षलक्ष या हातांनी
जळून होशील भस्म त्वरित
दिसशील मज ना पुन्हा कधी

चंदनाचा धर्मं झिजण्याचा
मी कधी नाही नाकारला
गुलाब सुद्धा मी नेहमी
काट्यांसहित स्वीकारला..

चंद्र एकटा आकाशीचा
असूनही तारका सभोवती
एकाकी राहतो सदैव
एकांताशी जुळली प्रीती..

चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…

चांद भरली रात आहे,
प्रियकराची साथ आहे..
मोगऱ्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसत आहे…

चांदण्याची सवय ,
खुपच असते भारी..
चांदरातीच्या मिलनाला..
उगाचच त्यांची लुडबुडती हजेरी….

चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही

चाफा माळून केसांत सये
उभी समोरचं डोळे मिटून,
गुन्हेगार जणू मोकळीच
माझ्याजवळचे सर्व लुटून…

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटतं…

चारोळी असते ती अशी
चार शब्दात खुप काही सांगणारी
कळन्यार्याला चार शब्द पुरेसे
न कळनार्याला काव्य अपुरे..

चारोळी करणं सोप अन छान असत.
एका ओळीत वाळवंट तर
दुसऱ्या ओळीत
हिरवं रान असत..

चारोळ्या माझ्या नाहीत
कविताही माझ्या नाहीत
तरीही या काव्याची मैफ़िल
सजते माझ्या वहीत

चालताना हळूच दचकून
माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित
मला तुझी साथ हवी…

आपल्याला हा लेख कसा आवडला, कृपया टिप्पणी देऊन सांगा मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल, जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्कीच हा लेख आपल्या मित्रांसह Share करा, आणि जर आपल्याला हा लेख आवडत नसेल तर मला माफ करा, मी आपला अनमोल वेळ वाया घालविला।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: