Top 20 Best Marathi Kavita For Love प्रेमीसाठी मराठी कविता

Contents

Marathi Kavita For Love प्रेमीसाठी मराठी कविता

नमस्कार मित्रांनो आज मी प्रेमासाठी सर्वोत्कृष्ट 20 कविता सादर करतो, आपण सर्व कविता वाचू शकता आणि आपल्याला याबद्दल आवडले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. If you like any marathi kavita for love you can share with your friends on Whatsapp, Facebook, Instagram, etc.

1. वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं आवरता

वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं सावरता

जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे

मी होते पाहिले

सौंदर्य ते डोळ्यात माझ्या

नव्हते ग मावले

वेगळी ती माझी नजर

तुला आली ओळखता

तू दिलीस कबुली प्रेमाची

नजर ही न वळवता

वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं सावरता

प्रयत्न तू करत होतीस

पण लाज नाही लपली गाली

हसलीस तेंव्हा अर्ध हास्य

ओठांतुन पडलं खाली

खाली पडणार हास्य तुझं

मला नाही आलं झेलता

गेलेला तो तोल माझा

नाही आला सांभाळता

वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं सावरता

होतीस लपवत आलेल्या

ओठांवरच्या त्या शब्दांना

डोळ्यातुन तुझ्या झळकल्या

लपलेल्या त्या भावना

बघत राहिलीस माझ्याकडे

तू थोडीही न बावरता

तुला बिलगलो मनानं मी

जरा ही न ओशाळता

वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं सावरता

माझ्या मनाला मला

नाही आलं आवरता

वेडं केलं प्रेमानं तुझ्या

नाही आलं सावरता

(marathi kavita for love)

2. Tu Majhi Zalis (marathi kavita for love)

रोज होतीस भेटत

पण तेंव्हा वेगळी वाटलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

सुर्यास्त पहाण्याचा

तुला होता छंद

माझ्या निर्मळ प्रेमाचा

नव्हता तुला गंध

त्या संध्याकाळी तू

खुप वेळ थांबलीस

बोलता बोलता अचानक

थोडी तू अडखळलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

मावळत्या प्रकाशात

चेहऱ्यावर तुझ्या लाली

अंधुकश्या उजेडात

लाज पसरलेली गाली

नेहमी बडबडणारी

तू शांत तेंव्हा होतीस

चोरट्या तिरक्या नजरेने

पहात तू हसलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

सुर्य गेला क्षितिजाआड

कि पाठ तुझी फिरायची

पण त्या दिवशी नव्हती

घाई तुला जाण्याची

क्षितिजाचे ते रंग

न्याहाळत तू राहिलीस

गुढ वेगळ्या विचारात (marathi kavita for love)

होती तू हरवलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

बावरलेली तुझी नजर

नव्हती माझ्याकडे वळली

मनातली तुझ्या चलबिचल

होती ग मला कळली

माझ्या शेजारी येवुन

आपसुकच तू बसलीस

नेहमीचा तो स्पर्श

पण तू थोडी शहारलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

तू हलकेच टेकवलेस

डोकं माझ्या खांद्यावर

तरंगत असलेलं तुझं मन

होतं विसावलं माझ्यावर

बंधनं सारी झुगारून

मला तू बिलगलीस

पापण्या मिटुन डोळ्यांच्या

प्रेमाची तू कबुली दिलीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

कळलं नाही मला

तू कधी माझी झालीस

Marathi Kavita Prem मराठी कविता प्रेम

3. Hota Tujhya Var Prem

होतं तुझ्यावर प्रेम

मी नाही सांगु शकले

पण आजवर तुला

नाही विसरू शकले

मनातले ते बोल

ओठांवर होते आले

पण ओठांवरचे शब्द

ओठांवरच रेंगाळले

नाही कळले मला

शब्द कसे रूसले

मुक्या त्या भावनांत

प्रेम नाही फुलले

हुदयातले भाव प्रेमाचे

कंठातच घुटमळले

होतं तुझ्यावर प्रेम

मी नाही सांगु शकले

तुला बघुन माझे

ह्रुदय होते धडकले

मनात माझ्या प्रितीचे

फुल होते उमलले

प्रेमाचे ते सुंदर फुल

माझ्या मनातच सुकले

मनी बांधलेले घरटे

नाही तुला दिसले

अल्लड मनाचं हास्य

माझ्यावर कायमचे रूसले

होतं तुझ्यावर प्रेम

मी नाही सांगु शकले

तू दूर गेलास आणि

मन माझे फरफटले

धडकणाऱ्या ह्रुदयाचे

संगीत जणु हरपले

सुंदर ते स्वप्न माझे

असे कसे विस्कटले

वाटलं जणु जीवनाचे

जहाज ते भरकटले

जुन्या त्या आठवणींनी

मन आज पुन्हा हुरहुरले

होतं तुझ्यावर प्रेम

मी नाही सांगु शकले

पण आजवर तुला

नाही विसरू शकले

(marathi kavita for love)

4. Tujhi Mazi Pheli Bhet (marathi kavita for love)

तुझी माझी पहिली भेट

होती काही क्षणांची

जुळली होती तेंव्हांच नाती

दोघांच्या मनाची

नजरेला माझ्या नजर देऊन

झुकली नजर ती विनयाची

तेंव्हा कळली माझ्या नजरेला

भाषा ग ती प्रणयाची

झुकलेली नजर उठली तुझी

साथ तिला पापण्यांची

नव्याने जाणवलेली मला

स्पंदने माझ्या ह्रुदयाची

नजर माझी नव्हती हटली

भुरळ तुझ्या सौंदर्याची

तुझी माझी पहिली भेट

होती काही क्षणांची

नव्याने ओळख झाली होती

डोळ्यांच्या त्या कमळांची

धडधड वाढली माझी बघुन

उघड झाप ती पाकळ्यांची

नजर तुझी सांगत होती

अनोखी भाषा ती प्रितीची

गरज नव्हती वाटली मला

जुन्या त्या प्रेमाच्या रितीची

श्वासांना ही झाली जाणीव

वेगळ्या त्या भावनांची

तुझी माझी पहिली भेट

होती काही क्षणांची

आठवणच नाही झाली मला

लिहुन आणलेल्या गाण्याची

गरजच नाही ग तुला तुझ्या

नजरेच्या तिरक्या बाणांची

नजर तुझी खुणवू लागली

वेळ झाली जाण्याची

नजर माझी शोधत होती

खात्री पुन्हा येण्याची

नजर माझी हटत नव्हती

ओढ तिला ग मिलनाची

तुझी माझी पहिली भेट

होती काही क्षणांची

जुळली होती तेंव्हांच नाती

दोघांच्या मनाची.

Marathi Kavita on Love Life

5. Love At First Sight

मनी तू ध्यानी तू

स्वप्नी तू माझ्या

कळत नसेल प्रेम माझं

तर विचार मनाला तुझ्या

लाजलेला मुखडा तुझा

डोळ्यासमोरून हटेना

अडखळलेल्या पावलांनाही

तुला सोडुन जावेना

एकदाच डोकावून डोळ्यात

बघना तू माझ्या

दिसतील तुला साऱ्या

आठवणी त्या प्रणयाच्या

मनात माझ्या भरलीस ग

पण डोळ्यात तू मावेना

भिरभिरत्या मनाला माझ्या (marathi kavita for love)

तुझ्या वाचुन रहावेना

थंड हवा फुलवते

जाणीवा तुझ्या स्पर्शाच्या

विसरलीस कशी तू

आठवणी त्या मिलनाच्या

तू नाहीस आणि

काहीच मनाला भावेना

तुझ्या वाटेवर नजर माझी

चैन डोळ्या पडेना

राणी तू , गाणी तू

कहाणीत तू माझ्या

कळत नसेल प्रेम माझं

तर विचार मनाला तुझ्या

Written By: Dr Subhash Katakdound – Khopoli

6. प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता न उमगले काय असे घडले

जे हरवलेले गतजन्मीचे पुन्हा नव्याने गवसले

बीज प्रितीचे तुझ्या अन् माझ्या हळूवार अंकुरले

पहिल्या भेटीत ह्रदयाने ह्र्दयास निमिषात हूंकारले

न आठवे परी वाटले ओळखीचे तुझे सारे काही

डोळ्यात तुझ्या हरवलो होतो माझ्या डोळ्यात तुही

तुझ्या नजरेनं तार छेडली झंकारली प्रित अंतरी

मंद स्मितीत तुझ्या दरवळला गंध चाफ्याचा मंदिरी

सहवासात भासला देह तुळशीचा सात्विक तो अंगणी

स्पर्शात तुझ्या सडा जुई प्राजक्ताचा गेला मजवर बरसूनी

मुखातले शब्द भासले ओळखीचे गतजन्मीचे आश्वासनं

गेले उचंबळूनी अंतःकरण दोन जणू नदी सागराचे मिलनं

(Written by Shubhangi Subash Gaikwad)

Marathi Kavita मराठी कविता (marathi kavita for love)

7. Your Eyes And My Small Village

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |

तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||

तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश

माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश

तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड

तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड

तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग

तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी

माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी

जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी

वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा

हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१|| (marathi kavita for love)

8. अशी सजशील गं

अशी सजशील गं माझी होशील गं

प्रेमात पाडून तू काळीज चोरून नेशील गं

माझ्या दिलाची गं आहे राणी तू गं

तुला पाहून काळजाचं होतं पाणी पाणी गं

अगं तुला शोधून थकलो राणी वनी गं

तुझ्याशिवाय वेड्याला नाही वाली कोणी गं

अशी आली अवकळा झाली अनहोनी गं

मग लॉकडाऊन वाढलं अडकलो दोन्ही गं

तुला व्हिडीओ कॉल केला होता काल गं

तू दिसलीच नाही झाले लई माझे हाल गं

अशी घरात राहून तू लई होशील गोरी गं

पण कधी विसरू नको तू मला पोरी गं

मी प्रेम केलं आहे नाही केली चोरी गं

मी तुला मिठीत घेईल पुन्हा बोलून सॉरी गं.

(Written By Amol Shinde) (marathi kavita for love)

9. Tujhi ओढ

भेटीसाठी नजरेला तुझ्या,पुन्हा

पळताना पहिलं,,

नाजुकश्या पाऊलांना तेव्हा कशाचेही

भान नाहीं राहिलं ,,

तळपत्या उन्हात कधी सावलीला

चुकुनही नाहीं पाहिलं ,

सैरावैरा पाहनाऱ्या तुझ्या डोळ्यातल्या

ओढीला सावरायचही राहिलं

भाव सारे डोळ्यातले

मुक्या शब्दांच्या मिठीत

अश्रूंना ओघळताना कधीच नव्हतं पाहिलं

कालं तुला गर्दित त्या,

एकटं एकटं

पहिलं।।।।

10. ओढ पावसाची (marathi kavita for love)

ओढ पावसाची

वाऱ्या सोबत डुलणाऱ्या झुडुपाची

सरीच्या पाऊसात चिंब भिजण्याची

ओढ पावसाची वेळ हिरवे रान सजण्याची

आतुरता फुलांना सर्वत्र सुगंध दरवळत

मनसोक्त मयूरा सोबत नाचण्याची

ओढ पावसाची वेळ काली माती अन

पावसाच्या पाण्याच्या मधूर मिलनाची

हसत खेळत सर्वांना आनंदीत करण्याची

ओढ पावसाची शेतकऱ्याच्या

जीवनाला हातभार लावण्याची

ओढ पावसाची कवीच्या मनातील

भावना कवितेत उतरविण्याची

(Written By Suraj Rathi)

11. Vishrun Bhagto

सकाळ दुपार मी तुझ्याच कल्पनेत हरवून जायचो….!!

संध्यकाळी मात्र कट्ट्यावर तुझी वाट पाहायचो..!!

कधी दिसायचीस, कधी नाही दिसायचीस….!!

दिसलीस कधी तर मनात खुश व्हायचो,

पण दिसली नाहीस तर लहान मुलं सारखा निराशही व्हायचो…!!!!!

रोज विचार करायचो कि आज बोलावे तुझ्याशी,

पण रागावशील, चीडशील तू अशी भीती होती ऊराशी….!!!

मित्रां मध्ये हरवून जाणारा मी,

कधी तुझ्यात हरवून गेलो माझे मला कळलेच नाही…!!!

आहे मनात आपुलकी तुझ्या बद्दल, वाटते करावी मैत्री प्रेम आणि बरच काही….!!

आज हिम्मत करेनच म्हणतो, उराशी असलेली भीती बाजूला सुरूच म्हणतो,

माहिती नाही तुझा उत्तर काय असेल तरी हि थोडा दिलासा मनाला देऊन बघतो….!!

12. तुझ्या गावचा पाऊस

तुझ्या गावचा पाऊस तेव्हा अवखळ होता,

मातीमध्ये तुझा अनोखा दरवळ होता,

उरला नाही तसा पाऊस, तशी माती;

नुसती आहे नभी ढगांची तळमळ आता.

तेव्हा पाऊस होता मनभर विसावलेला,

आता पाऊस आहे वनभर पिसाटलेला.

तेव्हा पाऊस अलगद होता,

आता पाऊस अवजड आहे.

तेव्हा पाऊस होता सोपा,

आता पाऊस अवघड आहे.

तेव्हा राणी तुझ्या सरीनी पाऊस होता सजलेला,

आता असतो पाऊस वेडा स्वतःमध्येच भिजलेला.

(Written By Vishal.R.Pawar)

13. तुलाच पाहतो ग

स्वप्नातल्या नयनरम्य सरोवरात जल शांत अन् नितळ

वर क्षितीजाल भिडलेलं घूमटाकार निरभ्र निळं आभाळ

भोवताली पाचूची हिरवी शाल लेऊनी ऊभी सुरेख कमळं

त्यात तू अन् मी करतो विहार करूनी निर्मळ मन मोकळं ग

तुलाच पाहतो ग

सरोवराच्या काठावर बसून नजरेने खूप गप्पा मरतो

तुझ्या गालावरून ओघळणारे जलबिंदू अलगद टिपतो

डोळ्यावर येणार्या खट्याळ बटांना हळूवारपणे सारतो

किरणांनी तेजोमय झालेल्या तुझ्या रूपाने मी भारावतो ग

तुलाच पाहतो ग

न बोलता खूप काही बोलतात भाव तूझ्या नजरेतले

जाणवतात सूरात चाललेली स्पंदने तुझ्या ह्र्दयातले

मंत्रमुग्ध करतात मला मंद स्मित तुझ्या ओठातले

रोमांचीत करते मला; सुख तुझ्या कोमल स्पर्शातले ग

तुलाच पाहतो ग

जीवनवळणावर पाहताच क्षणी झालीस तु माझी सखी

जरी असलो तुजसाठी मी फक्त एक वाटसरू अनोळखी

वेड लागले जीवा तु ह्र्दयसम्राज्ञी अन् तुच माझी चंद्रमुखी

जर झालीस तू माझी असेन माझ्या सारखा मीच सुखी

दिसे न मज कोणी ह्या भूलोकी अजूनही तुझ्या सारखी ग

तुलाच पाहतो ग.

(Written by Shubhangi Subash Gaikwad)

14. तुच चंद्र माझा

तुच चंद्र माझा, मी तुझीच चांदणी रे…

तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे…

स्वप्नापरी मज भासे सगळे..

आहे सत्य की ,आभास हे खुळे..

बदलुनी गेले, जग माझे सारे…

तुजवीन ना येई,कोणता ध्यास मना रे…

तुच चंद्र माझा ,मी तुझीच चांदणी रे….

पाहीले, ना कधी, मला मी इतके..

पाहीले, तुझ्या नजरेत, मला मी तितके..

एक-एक श्वास, जगते आता नव्याने रे…

शोधता अस्तित्व माझे,तुझ्यातच गवसते रे..

तुच चंद्र माझा,मी तुझीच चांदणी रे…

तुच सखा माझा, मी तुझीच सावली रे…

(Written By Deeksha)

15. तुझं अनं माझ प्रेम

तुझं अनं माझ प्रेम…

गुलमोहरा प्रमाणे फ़ुलू दे प्रत्येक क्षण वाऱ्यावर झुलू दे I

तुझं अनं माझा प्रेम….

मोगऱ्या प्रमाणे बहरू दे त्या प्रेमाच सुगंध सर्वत्र दरवळू दे I

तुझं अनं माझा प्रेम…

निवडुंग प्रमाणे होऊ दे काट्यामध्ये सुद्दा फुलून येऊ दे I

तुझं अन माझं प्रेम …

सागराप्रमाणे विशाल होऊ दे मन सोक्त वाहून पैलतीरी जाऊ दे I

तुझं अनं माझा प्रेम…

जमिन आणि आकाश प्रमाणे होऊ क्षितीजया प्रमाणे भासू दे एकत्र आले नाही तरी हसू दे I

तुझं अनं माझा प्रेम…

चंद्र सारख असू दे दिवस आकाशाची साथ सोडली तरी रात्रीत दिसू दे I

तुझं अनं माझा प्रेम..

राधा कृष्णा प्रमाणे असू दे एकत्र नसले तरी प्रत्येकाला स्मरू दे I

तुझं अनं माझा प्रेम…

प्रेमच असू दे भावाने ला भार झालाय

थांब!………… जरा आश्रू पुसुदे I

तुझं अनं माझा प्रेम …

प्रेमच असू दे…….. II,

16. अबोल प्रेम

हे फक्त माझ्याचसोबत

नेहमी असंच घडणार आहे?

तुझ्याबरोबरची प्रत्येक भेट

‘ते’ न बोलताच संपणार आहे?

भेट-वेळ रोजची ठरलेलीच

तरी अजून काय ठरणार आहे?

बोलायचं पटकन पण वेडं मन

त्याचाही मुहुर्त पाहणार आहे !

भेटतो तेव्हाच माहित असतं

निघायची वेळ येणार आहे

पटकन विचारावा प्रश्न हवासा

तर शब्द ओठीच अडणार आहे !

मी न विचारताच तू काय

हवं ते उत्तर देणार आहे?

हे पुरतं कळतंय तरीही

तोंड माझं का बोलणार आहे?

न बोलता बोललेले शब्द

तुला वेड्याला कळणार आहे?

मी बोलले/न बोलले तरी गप्पच

नेहमीसारखा तू राहणार आहे !

भावभावना समजून घेणं

सगळंसगळं थांबणार आहे

उष्ट्या कुल्फीची चव मात्र

जिभेवरती रेंगाळणार आहे

स्वप्न माझं हे संपलं तरीही

मनात तूच उरणार आहे

तुझ्यात मी नसले तरी

माझ्यात तूच सापडणार आहे!

17. प्रेम काव्य

मी त्या बेवड्या सारखा आहे

जसा तो त्या दारुच्या बोटल वर प्रेम करतो

तसं मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो

मी त्या बेवड्या सारखा आहे

त्याला माहीती आहे की दारू पिल्याणे त्याचं लिवर कमजोर होईल

तरीही तो ती बोटल ह्रदयाला लावुन बसतो

तसं मला माहिती आहे तूला आठवल्या नंतर खूप त्रास होतो

तरीही मी सारखं सारखं तुझ्या आठवणीत बसतो

मी त्या बेवड्या सारखा आहे

त्या दारूच्या बोटल वर लिहिले असतं (दारू स्वस्थासाठी हानिकारक आहे)

तरीही तो त्यातले दोन थेंब हि न सोडता पुर्ण बोटल प्रेमाने पिउन टाकतो

तसं मला माहिती आहे तु मला आपलं कधी नाही समजणार

तरीही मी घरच्यां पेक्षा जास्त तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो.

मी त्या बेवड्या सारखा आहे

शेवटी मरताना ही तो दारू चांगली होती

साला लिवर कमजोर निघालं असं बोलत बसतो

तसं मला माहिती आहे मी कुठे तरी तुझ्या नजरेत कमी आहे

तरीही मी नशीबाला दोष देत बसतो.

(Written By Rohan Rajendra Bhosale)

18. फक्त तू

तुझ्या बद्दल बोलु किती ?

आता शब्द पुरत नाही

तुझ्या बद्दल लिहु तरी किती ?

आता कागद पण पुरत नाही

कवितेला सुरुवात करावी तर

शेवट कसा करावा कळत नाही …

नविन कवितेला माझ्या आता

तुझ्या शिवाय कोणाची साथ मिळत नाही …

तुझ्या आठवणी मध्ये रमाव तर

तिथून परत यावस वाटत नाही …

तुझ्या सोबत दोन क्षण सोबत राहावं तर

परत सोडून जावसं वाटत नाही …

काय केली तू जादू अशी

आता उतरायला मागत नाही …

तू स्पर्श करून गेलास माझ्या हृदयाला

आता तुझ्यावर प्रेम केल्याशिवाय राहवत नाही ….

(Written By Priyanka)

19. तिचं माझं प्रेम हे

खूप दिवसांपासून

तिच्या मागावर असायचो

तिला पटवायचं म्हणून

तिच्या विरुद्ध वागायचो

नियतीचा खेळ किती

ती मी एक वर्गात आलो

नजर तिच्यावर असतांना

वर्गातून मी हद्द पार झालो

तसा टुकार होतो साऱ्यात

कॉलेज ही कंटाळलं होतं

मी का वागलो तसा म्हणून

आज डोळ्यात पाणी येतं

तिच्या साऱ्या मैत्रिणींनी

राख्या बांधल्या होत्या

पाच सहा जणी होत्या

मनाने खूप चांगल्या होत्या

एक दिवस तिनं उपवासाचं

माझ्यासाठी आणलं खायला

विचारलं मी कोण नाही तुझा

तुला काय झालं काळजी करायला

चुकीचे नाद सोडून दे सारे

ती मला म्हणाली होती

कशाला असा वागतोस

तुझी हिचं काळजी वाटती

कशाला काळजी करतेस माझी

तू टुकार म्हणून धिक्कारलं

तू आवडतोस म्हणून आज

तुझ्यावरचं प्रेम मी स्वीकारलं

तिचं प्रेम सर्वांसमोर स्वीकारून

मी तिला होकार दिला होता

तेव्हा आठवणींच्या पलीकडचा

झोका नकळत मी घेतला होता

(Written By Amol Bhau Shinde Patil)

20. मला वाटायचं

मला वाटायचं तू मला प्रेम करायची

तुझ्यासाठी तो निव्वळ एक खेळ होता ,

तुला करमणुक होती ती वेळ घालवायची

माझ्यासाठी तो दोन हृदयांचा मेळ होता ॥१॥

मला वाटायचं तू माझ्यासोबत आयुष्य घालवशील

तुझ्यासाठी तो क्षणभरचा सहारा होता ,

तू आता आनंदात कुठेतरी जगत असशील

माझ्यासाठी प्रेमच तुझं आशेचा निवारा होता ॥२॥

मला वाटायचं तुला माझ्यासोबत वेळ घालावायला आवडते

पण तो तुझा फक्त एक बहाणा होता ,

तू खोटं बोलून खऱ्या हृदयाशी माझ्या काय मिळवते

मला कळेल एवढं कुठे माझं हृदय शहाणा होता ॥३॥

मला वाटायचं तू मला खूप जीव लावते

तुझ्यासाठी मी म्हणजे विषय छोटी ओळख होता ,

तू किती सहजच मला चुकीचा ठरवते

मला कुठे माहीत होतं तुझ्या हृदयात काळोख होता ॥४॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: