Success story of quora founder in marathi – Quora च्या संपादकांची यशोगाथा

 मित्रांनो आपण इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही quora हा शब्द नक्कीच एकला असेल. आज quora ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी प्रश्न उत्तर वेबसाईट (QnA website) आहे. जिला की फोरम वेबसाईट (forum website) देखील म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का हो quora आज इतक्या प्रसिद्धीस येण्यास काय कारण आहे, quora च्या संस्थापकाची यशोगाथा काय आहे ( success story of quora founder in marathi). तर चला मग पाहूया success story of quora काय आहे मराठीमध्ये…

Success story of quora founder in marathi – quora च्या संस्थापकाची यशोगाथा काय आहे

मित्रानो तुम्हाला मी Quora ची success story सांगण्यापूर्वी quora काय आहे थोडक्यात सांगतो.

Quora ही एक जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सर्वात जास्त लोकप्रिय असणारी प्रश्न उत्तर वेबसाईट आहे. जेथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि कोरा वरील इतर सदस्य तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात. quora वर प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला आधी quora चे सदस्य व्हावे लागते त्यासाठी तुम्ही तुमच्या google अकाउंट द्वारे sign up करून कोरा चे सदस्य बनू शकता.

Quora सदस्य बनल्या नंतर तुम्ही quora वर तुमचे प्रश्न विचारू शकता आणि इतर सदस्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकता.

तर चला मग पाहूया success story of quora marathi कोरा ची यशोगाथा काय आहे तर

Quora founder success story in marathi

मित्रांनो २००९ मध्ये Adam D’Angelo आणि Charlie Cheever या दोघांनी मिळून Quora ची निर्मिती केली. Quora inc ही quora ची कंपनी कॅलिफोर्निया येथील माउंटन व्ह्यू येथे स्थित आहे. ५ जून २००९ मध्ये quora सुरू केली गेली आणि quora website चे पूर्ण व्यवस्थापन करून एका वर्षानंतर म्हणजेच १० जून २०१० मध्ये quora ला इंटरनेट वर लाँच केले गेले.

Quora तुम्हाला प्रश्न विचारण्याचे आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. Quora ही Adam D’Angelo आणि Charlie Cheever यांच्या कल्पनेतून आणि अथक प्रयत्नांतून उभी राहिलेली कंपनी आहे.

Quora च्या संस्थापक बद्दल माहिती

Adam D’Angelo information in marathi

Adam D’Angelo हे quora च्या संकल्पनेचे मुख्य master mind असून ते फेसबुक चे संस्थापक mark jhukarberg चे अगदी जवळचे मित्र आहेत. Adam आणि mark jhukerberg या दोघांनीही फिलिप्स एक्झिट अकॅडमी या शाळेतून शिक्षण घेतले. ते दोघेही शालेय मित्र होते.

त्यानंतर Adam यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून कॉम्पुटर सायन्स (संगणक विज्ञान) विषयात पदवी प्राप्त केली.त्यांनी २००५ सालि झालेल्या कॉलेज कोडिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला.

“Quora success story in marathi” तेथूनच मग Adam आणि mark jhukerberg यांच्यात जास्त जवळीक वाढली. नंतर २००४ मध्ये मार्क झुकरबर्ग ने फेसबुक तयार केल्यानंतर Adam ला त्यात कंपनीच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. नंतर २००८ मध्ये त्यांची फेसबुक च्या मुख्य तंतज्ञान अधिकारी (CTO) म्हणून पदोन्नती झाली. Adam यांनी नंतर सुमारे दोन वर्ष फेसबुक सोबत काम केले, त्यांनी data science वर काम करून फेसबुक ची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले.

Charlie Cheever information in marathi

Charlie Cheever यांनी संगणक विज्ञान मध्ये पदवी घेतली होती आणि ते कोडिंग करण्यात वस्ताद होते. त्यामुळे त्यांना २००६ मध्ये फेसबुक कडून ईमेल द्वारे जॉब ची ऑफर आली. त्यांनी सुरवातीला ईमेल कडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर त्यांचा विचार बदलला आणि फेसबुक जॉईन केले. तत्पूर्वी त्यांनी अमेझॉन (Amazon) कंपनीसाठी काम केले होते.

Quora ची संकल्पना कशी उदयास आली? (How concept of Quora grown up)

Adam च्या लक्षात आले होते की google वर प्रश्न उत्तरासाठी योग्य असा प्लॅटफॉर्म नाही आणि ते एक प्रश्न उत्तर वेबसाईट तयार करण्यासाठी विचारात होते.

Adam आणि Charlie Cheever हे दोघेही फेसबुक मधे काम करत असताना एका मीटिंग मध्ये दोघांची ओळख झाली आणि नंतर ते चांगले मित्र बनले. Adam यांनी चार्ली ला आपल्या संकल्पनेबाबत माहिती दिली आणि दोघांनी यावर विचार केला. लोकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी एक कंपनीची आवश्यकता पडेल ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतंत्र कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला.

अखेर ५ जून २००९ मध्ये त्यांनी फेसबुक सोबत पदभरची रजा घेऊन कॅलिफोर्निया येथील माउंटन व्ह्यू येथे Quora inc. या कंपनीची स्थापना केली. आणि त्यानी २०१० मध्ये Quora ही वेबसाईट गूगल वर लाँच केली.

सुरूवातीला लोकांना quora हे एक गूगल सारखे सर्च इंजिन च वाटले परंतु नंतर त्यांचा लक्षात आले की quora हे सर्च इंजिन नसून त्याचे गूगल पेक्षा वेगळे कार्य करते. सुरुवातीच्या काळात कंपनीला funding साठी खूप अडचण आली त्यांना त्यांच्या कल्पनेवर एवढा विश्वास होता की त्यांनी एक वेळ स्वतःचा पूर्ण पैसे कंपनी मध्ये लावले.

Quora वरील सामग्री वापरकर्त्यांना मोल्यावान आणि उपयुक्त वाटल्यामुळे quora चा युजर बेस वाढतच गेला आणि अल्पावधीतच quora प्लॅटफॉर्म ची लोकप्रियता एका वेगळ्या पातळीवर गेली. २०११ पर्यंत quora मध्ये ५००००० पेक्षा भी जास्त सदस्य झाले आणि नंतर हा आकडा वाढतच गेला. त्याच्या पुढच्याच वर्षी चार्ली ने कंपनीचा पदभार सोडला आणि एक सल्लागार म्हणून काम करण्याचे ठरवले.

Quora success story in marathi

त्यानंतर कंपनीचा पूर्ण पदभार हा Adam यांनी सांभाळला.आज कोरा यशाच्या सर्वात उंच शिखरावर पोहचले आहे आणि जाहिराती मार्फत करोडो रुपयांची कमाई करत आहे. पण quora ने योग्य प्रश्न आणि उत्तरं देणारा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. आज quora वर ४ लाखापेक्षा भी जास्त विषय आहेत आणि दरमहा ६९६ दशलक्ष वापरकर्ते quora वापरतात. त्यामुळे आज घडीला quora हे एक प्रश्न उत्तराचे hub बनले आहे.

कोराच्या यशानंतर २०१३ मध्ये quora ने ब्लॉग ची भी सुविधा दिली आहे ज्याद्वारे लोक विविध विषयावर लेख देखील लिहू शकतात आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे जानेवारी २०१९ पासून quora ने मराठी, तमिळ यासारख्या भाषांना quora वर मान्यता देऊन पार्टनर प्रोग्राम चालू केला आहे. ज्याद्वारे quora कोरावर नियमित प्रश्न विचारणाऱ्या वापरकर्त्यांना देखील जाहिरातीतील कमाईचा थोडा हिस्सा देत आहे. त्यामुळें quora वर विविध विषयांची माहिती मिळेल आणि आणि पैसे देखील कमावू शकू.

निष्कर्ष – Quora success story

मित्रांनो आज आपण Quora ची यशोगाथा (Quora success story in marathi) पहिली. Quora ची दिवसेंदिवस होणारी प्रगती दर्शविते की कशी एक जिज्ञासू आणि ठाम कल्पना नवीन शोधाला जन्म देते. Quora ही आज इंटरनेट जगतातील सर्वात उत्तम आणि उपयुक्त वेबसाईट आहे जी केवळ नफा कमावत नाही तर दिवसेंदिवस आपल्या जीवनात मूल्य जोडत आहे.

आपल्याला या Quora success story marathi मधून ही सिख मिळते की आपण आपल्या कल्पनेवर आणि विचारावर ठाम असले पाहिजे आणि सतत च्या प्रयत्नांनी यश नक्कीच मिळते फक्त आपण संयम ठेवणे गरजेचे आहे.

मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही quora ची यशोगाथा नक्कीच आवडेल आणि तुमच्या ध्येय पूर्तीसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: