आता quora देणार तुमच्या प्रश्नांची मराठीतून उत्तरे – जाणून घ्या quora काय आहे?
Quora information in marathi (Quora म्हणजे आहे?) – हो तुम्ही एकदम बरोबर एकलत! quora आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे मराठीतून देण्यासाठी सज्ज झाले आहे. तुम्हाला माहिती असेल की यापूर्वी quora वर केवळ हिंदी ही एकच भारतीय भाषा उपलब्ध होती ज्यामध्ये लोक हिंदीतून प्रश्न विचारू शकत होती आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हिंदीतून मिळवत होती.
परंतु भारत हा एक बहुभाषिक देश आहे हिंदी ही जरी भारताची राष्ट्रीय भाषा असली तरी इतर अनेक प्रांतीय भाषा बोलणारा लोकांचा एक खुप मोठा वर्ग येथे आहे. असे अनेक भारतीय लोक आहेत जे फक्त प्रांतीय भाषा च जाणतात आणि त्यांना हिंदी व इंग्रजी बद्दल जास्त आकर्षण नाही. परंतु quora वर प्रांतीय भाषांना वाव नव्हता त्यामुळे कित्येक भारतीय लोक हे त्यांच्या प्रांतीय भाषेतून ज्ञान व माहिती मिळवणं पासून वंचित राहत होते त्यांना त्यांच्या प्रांतीय भाषेतून योग्य व आचुक माहिती मिळत नव्हती.
त्यामुळे quora ने या प्रांतीय भाषेतील लोकांना माहिती मिळवण्याचा एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि आपली जागतिक व्याप्ती वाढवण्यासाठी तेलगू आणि मराठी सारख्या अनेक प्रांतीय भाषांना २०१९ च्या शेवटी quora वर मान्यता दिली. त्यामुळे मराठी भाषेतील लोकांसाठी आता आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यसाठी इंटरनेट जगतातील सर्वात उत्तम असं व्यासपीठ मिळालं आहे.
तुम्ही quora विषयी ही माहिती वाचली पण तुम्हाला खरंच माहिती आहे का हो, quora काय आहे? Quora म्हणजे काय? तर मंडळी आजच्या या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की quora काय आहे आणि quora म्हणजे काय? यासारखी quora बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 Quora काय आहे (what is quora in marathi)
- 2 Quora बद्दल माहिती ( information of quora in marathi)
Quora काय आहे (what is quora in marathi)
Quora हे एक प्रश्न उत्तराची वेबसाईट (QnA website) आहे. जेथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला माहीत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकता. Quora वर अनेक सदस्य असतात ते प्रश्न विचारण्याचे आणि प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम करतात.
ज्याप्रमाणे फेसबुक, व्हॉट्सऍप हे सोशल मीडिया साईट्स आहेत त्याच प्रमाणे quora ही एक फोरम वेबसाईट (forum website) आहे. जेथे तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात. Quora सर्व प्रकारचे डॉक्टर, इंजिनिअर, वकील,शिक्षक, सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही quora वर तुमच्या प्रश्नांची उत्तरे सहज तज्ञा मार्फत मिळवू शकता आणि तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही इतर लोकांसोबत वार्तालाप देखील करू शकता.
त्यामुळे आजघडीला क्वोरा चा क्रेझ वाढतच चालला आहे. मराठी quora आल्यापासून महाराष्ट्रातील मराठी भाषिक अनेक युवक युवतींचा व्हॉट्सऍप, फेसबुक प्रमाणे quora वापरण्याकडे कल वाढतच चालला आहे. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील किंवा तुम्हाला विविध विषयावर लिहायला आवडत असेल तर तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरू शकतो, तुम्ही आज च quora जॉईन करा.
Quora बद्दल माहिती ( information of quora in marathi)
Quora चा निर्माता कोण आहे? (Founder of quora)
Quora कुणी तयार केला – Quora हि एक जगप्रसिद्ध QnA वेबसाईट आहे. या वेबसाईट ला Adam D’Angelo आणि Charlie Cheever या दोघांनी मिळून बनवले आहे. हे दोघे quora चे founder आहेत.Adam D’Angelo आणि Charlie Cheever हे दोघेही पूर्वी फेसबुक मध्ये काम करायचे. फेसबुक च्याच एका मीटिंग मध्ये दोघांची ओळख झाली आणि नंतर ते चांगले बेस्ट फ्रेंड बनले. त्यांनी नंतर लोकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी दोघांनी मिळून एक स्वतंत्र कंपनी तयार केली आणि तिला नाव दिलं “Quora”.
Quora ला quora हे नाव कशावरून देण्यात आलं?
Quora या नावाची निर्मिती quorum या शब्दापासून झाली आहे. quorum या शब्दाचा मराठी अर्थ आहे लोकांचा एक समूह जो एकत्रित येऊन एखाद्या विषया बद्दल चर्चा करून एकमत निर्माण करतो. त्यामुळे या QnA वेबसाईट च Quora हे नाव पडलं.
काही लोक असं ही म्हणतात की quora या शब्दाची निर्मिती ‘qu’ आणि ‘a’ या दोन अक्षराना or जोडून “quora” हा शब्द तयार झाला आहे. qu म्हणजे question आणि a म्हणजे answer.
Quora ची निर्मिती कधी झाली? (When quora was founded?)
Quora ला Adam D’Angelo आणि Charlie Cheever या दोघांनी मिळून ९ जून २००९ मध्ये तयार केले आणि एक वर्ष या वेबसाईट वर काम केल्यानंतर ही वेबसाईट २१ जून २०१० मध्ये लोकांना वापरण्यासाठी इंटरनेट वर लाँच केली गेली
Founded: ९ जून २००९
Launched: २१ जून २०१०
Quora ची कंपनी/ऑफीस कुठे स्थित आहे?
Quora कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथील माउंटन व्ह्यू येथे स्थित आहे. आज पर्यंत या कंपनीने अनेक आव्हानांना तोंड देत गूगल च्या रँकिंग मध्ये पहिल्या शंभर वेबसाइट्स मध्ये नंबर मिळवला आहे. त्यामुळे आज घडीला ही एक सर्वात प्रसिद्ध फोरम वेबसाईट आहे.
Quora कोण कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध आहे?
सुरुवातीला quora website ही केवळ इंग्रजी भाषेमध्ये च उपलब्ध होती पण आज quora इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि मराठी सह अनेक प्रांतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Quora वेबसाईट वर तुम्ही कोणती कामे करू शकता?
- विविध प्रश्न विचारून माहिती मिळवू शकता
- इतरांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता
- एखाद्या विषयावर मंच तयार करू शकता
- Quora वरील सदस्यांशी एखाद्या विषयावर चर्चा करू शकता
- Quora वर स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता
- तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल तर विविध विषयावर लेख लिहू शकता
- Quora partner program मार्फत पैसे कमावू शकता
निष्कर्ष: quora काय आहे?
मित्रानो तुम्हाला आता quora काय आहे, quora म्हणजे काय समजले असेल आणि quora कशा साठी वापरतात हे देखील तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरे मराठीतून मिळवायची असतील किंवा तुम्हाला विविध विषयावर लेख लिहायला आवडत असेल तर तुम्ही देखील quora नक्की जॉईन करा.
मी स्वतः quora चा वापर करतो आणि मला quora मधून खुप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि नवीन विषयावर खूप छान माहिती देखील मिळते. तुम्हाला जर quora जॉईन कसा करावा माहीत नसेल तर मी तुम्हाला माझ्या पुढच्या पोस्ट मध्ये त्याबद्दल माहिती देतो.
मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि ही माहिती तुमच्या मित्रमंडळी सोबत शेअर करायला विसरू नका, खाली काही व्हॉट्सऍप, फेसबुक चे बटण आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही ही माहिती शेअर करू शकता, धन्यवाद…!!!