Jawhar Taluka information in marathi | जव्हार तालुका माहिती

जव्हार हे एक ठिकाण आपल्या पालघर जिल्यातील निसर्गाच्या सौंदर्याचे सर्वांत उत्तम उदाहरण आहे तसेच इथे अनेक मानवनिर्मित आकर्षक ठिकाणे देखील आहेत. जव्हारमधे असंख्य नयनरम्य ठिकाणे आहेत ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेले आणि मुंबईपासून सुमारे 165 व पालघर पासून सुमारे 68 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी असलेले आल्हाददायक हवामान आणि सुंदर निसर्ग सौंदर्य लाभले असल्याने वर्णन करण्यासाठी शब्दांच्या पलीकडे आहे. जव्हारला अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत जे आपल्याला 14 व्या शतकाच्या इतिहासात घेऊन जातात.

जव्हार करांनी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. जव्हार हे वारली चित्रांसाठी प्रसिद्ध आहे.
येथील तारपा नाच हे सांस्कृतिक नृत्य ( Tarpa dance ) सुप्रसिद्ध आहे.

जव्हारला जयविलास राजवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श झालेले शिरपामाळ, दाभोसा धबधबा, कालमांडवी धबधबा, हनुमान पॉइंट तसेच येथील संस्कृतीचा अनुभव घेता येतो.

Jawhar Taluka Area

जव्हार हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक तहसील आहे. जनगणना 2011 च्या जनगणना माहितीनुसार जव्हारची एकूण लोकसंख्या 1,40,187 आहे. तसेच जव्हार चे क्षेत्रफळ 620.6 किमी आहे

Jawhar Taluka Village List

Adkhadak Kayari Shivajinagar
Aine Kelghar Shrirampur
Akare Khadkhad Shrirampur
Akhar Khambale Suryanagar
Alyachimet Kharonda Suryanagar
Anantnagar Khidse Talasari
Aptale Kirmire Tilonde
Ayare Kogade Tuljapur
Barawadpada Kortad Umbarkheda
Behadgaon Kuturvihir Vangani
Bhagada Malghar Vavar
Bharasatmet Manmohadi Vijaynagar
Bhuritek Medha Wadoli
Bopdari Medhe Walwande
Borale Morchachapada Winwal
Chambharshet Nandgaon Zap
Chandgaon Nandnmal Hiradpada
Chandranagar Nyahale Bk. Jambhulmaya
Chandrapur Nyahale Kh Jamsar
Chauk Ozar Jawhar Rural
Dabheri Palshin Jayeshwar
Dabhlon Pathardi Juni Jawhar
Dabhose Pimpalgaon Kadachimet
Dadar Koprapada Pimpalshet Kalamvihira
Dadhari Pimprun Kanadhatti
Dahul Poyshet Kardhan
Daskod Radhanagari Kasatwadi
Dehare Raitale Kashivali Tarf Dengachimet
Dengachimet Rajewadi Kaulale
Devgaon Ramnagar Savarpada
Dhanoshi Ramnagar Shirasgaon
Dharampur Rampur Shiroshi
Dongarwadi Ruighar Shivaji Nagar
Ganeshnagar Sakharshet Garadwadi
Gangapur Sakur Ghiwande
Hade Sarsun Gorthan
Hateri

History of Jawhar | जव्हारचा इतिहास

Jawhar taluka ला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. ५ जानेवारी १६६४ रोजी शिवाजी महाराज स्वत: जातीने सुरतेवर स्वारी करण्यास निघाले असता छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय जव्हारला लागले. त्यांना जव्हारच्या राज्यातून जाण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी जव्हारच्या मुकणे राजांची सदिच्छा भेट घेतली. जव्हारचे राजा विक्रमशहा मुकणे यांनी. शिवाजी महाराजांचे मोठे स्वागत केले.

जव्हार राज्याची स्थापना राजा जयाबा मुकणे यांनी 1343 मध्ये केली होती, जव्हार ही राज्याची राजधानी होती. हे राज्य अनेक स्थित्यंतरांमधून गेले आणि 1947 मध्ये भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत सहाशे वर्षांहून अधिक काळ टिकले. ब्रिटिश राजवटीत, एक रियासत म्हणून, हे राज्य Bombay presidency चा एक भाग होते री. राजा यशवंत राव मुकणे 1947 मध्ये भारतीय संघराज्यात औपचारिक एकत्रीकरणापूर्वी जव्हारचा शेवटचे शासक होते.

भेट देण्याची उत्तम वेळ

Jawhar taluka हे असे ठिकाण आहे जे वर्षभर आपल्याला निसर्गच्या सौंदर्याचा आनंद देत राहते. कारण जव्हारचे हवामान वर्षभर आल्हाददायक राहते, ज्यामुळे ते फिरण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण बनते.

पण पावसाळ्यात येथील निसर्गाच्या सौंदर्याला बहर येतो. सगळीकडे येणारी हिरवळ, dabhosa waterfall व kalmandavi waterfall he दोन्ही jawhar waterfall चे उंचावरून पडणारे पाणी हे बघताना भान हरवून जाते.

पर्यटक आकर्षणे

1) jay vilas palace jawhar rajwada | जयविलास पॅलेस (जव्हारचा राजवाडा)

Jay vilas palace हे jawhar taluka मधील एक ऐतिहासिक आकर्षण आहे. हा महाल राजा यशवंत मुकणे यांनी बांधला होता. हा वाडा मुकणे राजघराण्याचा निवासी वाडा होता महाल वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राजवाड्यात 50 पेक्षा जास्त खोल्या आहेत

राजवाड्याचे आतील भाग मुकणे घराण्याच्या राजांची समृद्ध
संस्कृती आणि जीवनशैली दर्शवतात.. डोंगराच्यावर बांधलेला हया राजवाड्याभोवती एक बाग आहे तसेच आजूबाजूला सर्वत्र घनदाट जंगल आहे. जे ह्या राजवाड्याला अधिक सौंदर्य प्रदान करते. नवीन राजवाडा यशवंतराव मुकणे यांनी १९३८ ते १९४२ या सालांत बांधला.

Jawhar rajwada च्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड हे साखरा गावातील खदानातून आणले गेले होते, जे त्याच्या स्थानापासून 16 किमी अंतरावर आहे. असे म्हणतात की राजवाड्याचे बांधकाम साठी 50 हजार रुपयांचा खर्च हा त्यावेळी आला होता.

मुकणे राजघराण्याचे वंशज महेंद्रसिंग हे पुण्यात शहरात राहतात . वर्षातून बहुतेक वेळा ते येथे येत असतात. तसेच दर दसऱ्याला ते सण साजरा करण्यासाठी सुद्धा जव्हार येथील राजवाड्यात येतात.

2) Hanuman point jawhar | हनुमान पॉइंट

हनुमान पॉइंट हे Jawhar taluka मधील एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. पौराणिक कथेनुसार असे म्हणतात की प्रभू श्रीरामाचे शिष्य असलेल्या हनुमानाने प्रभू श्रीरामांचा भाऊ भरतला भेटण्यासाठी येथूनच प्रवास केला आणि येथे विश्रांती घेतली होती यांच्यामुळेच या जागेला हनुमान पॉइंट असे नाव पडले आहे

Hanuman point हे ठिकाण जव्हारमधील प्रसिद्ध जय विलास पॅलेस किंवा जव्हारचा राजवाडा जवळ आहे. हे ठिकाणजवळ मोठी दरी आहे. ह्या ठिकाणावरून दरीचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.

ही दरी जवळजवळ 500 फूट खोल आहे. नूतनीकरणादरम्यान मंदिराजवळ एक व्ह्यू पॉइंट तयार करण्यात आला, जो हनुमान पॉईंट म्हणून ओळखला जातो. या दरीला देवकोबाचा कडा असेही नाव आहे.

3) Sunset point jawhar | सनसेट पॉईंट

जव्हारच्या मध्य भागातून पश्चिमेकडे सुमारे 0.5 किमी आणि निसर्गाची वेगळीच किमया लाभलेला हे ठिकाण म्हणजेच सनसेट पॉईंट. Sunset point jawhar च्या सभोवतालच्या दरीचा आकार धनुष्यासारखा आहे त्यामुळे खूप वर्षांपूर्वी ते धनुकमल या नावाने सुद्धा ओळखले जात होते. ह्या ठिकाणी सूर्य मावळतीच्या वेळी खूपच रम्य देखावा आपणास बघायला मिळतो.

4) Dabhosa Waterfall jawhar | दाभोसा धबधबा

धबधबे पाहण्यात नेहमीच आपल्याला खूप आनंद मिळत असतो.
त्यात जव्हारच्या दाभोसा धबधबा किंवा dabhosa watertall हा सुंदर निसर्गाने तसेच जंगलाने वेढलेला आहे. Jawhar waterfall पैकी खूप मोठा धबधबा आहे.

धबधब्याच्या आजुबाजुला किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांसह धबधबाचा आवाज आणि सुंदरतेने चमकणारा धबधबा पाहणे खूप मजेदार आहे. जव्हारमधील हा धबधबा पालघर पासून जवळपास 68 km अंतरावर आहे तसे जव्हार शहरापासून जवळपास 18 km अंतरवर आहे.

पावसाळ्यात Dabhosa Waterfall jawhar चे निसर्गरम्य दृश्य बघताना मनाला वेगळेच सुख मिळते. दाभोसा धबधबा लेंडी नदीवर आहे धबधब्याची उंची सुमारे 300 फूट आहे. दाभोसा धबधब्याच्या तळाशी असलेला तलाव खरोखर एक देखनिय स्थळ आहे.

5) Kalmandvi Waterfall jawhar | कालमांडवी धबधबा

Kalmandavi Waterfall हा जवळपास 328 feet उंचीचा आहे आणि तो फक्त पावसाळ्यातच नाही तर वर्षभर वाहत असतो, तरीही या धबधब्याचे सर्वात निसर्गरम्य दृश्य पावसाळ्यातच बघायला मिळते. जव्हार ते कालमंडवी हे Jawhar taluka ने झाप रस्त्याने अंदाजे 6 ते 7 किमी आहे

6) Khad khad dam | खड-खड धरण

जव्हार शहराजवळील khad khad dam एक मोठे धरण आहे. धरणाचे अतिरिक्त पाणी प्रचंड खडकांमधून वाहते जे धबधब्याच्या स्वरूपात दिसू शकते.
सुंदर निसर्गरम्य ठिकाणांसह जव्हार शहराजवळील हे एक प्रमुख धरण आहे. हे धरण जव्हार पासून जवळपास 11 ते 12 km अंतरावर आहे

थकलेले मन आणि शरीर शांत करण्यासाठी हे ठिकाण शांततापूर्ण नैसर्गिक वातावरण प्रदान करते. याशिवाय धरणाचे अतिरिक्त पाणी प्रचंड खडकांमधून वाहते आम्हाला खात्री आहे, त्याचे सौंदर्य तुम्हाला नक्कीच मोहित करेल.

7) Shirpamal jawhar | शिरपामाळ

Shirpamal ह्या jawhar taluka मधील ठिकाणाला खूप जुना इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुरतवर हल्ला करण्यासाठी जेव्हा सुरतच्या दिशेने कूच करत होते तेव्हा त्यांनी सैन्याची छावणी जव्हार संस्थानाजवळ उभारली होती आणि त्यांनी जव्हार चे राजे विक्रमशहा मुकणे यांची भेट घेतली. त्यातील शिरपामाळ म्हणजे त्यांच्या भेटीचे ठिकाण.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 31 डिसेंबर 1664 रोजी ही भेट दिली होती त्यानंतर 1 मे 1995 रोजी जव्हार नगरपरिषदेचे अध्यक्ष राजाराम मुकणे यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधले

Shirpamal खूप लोकप्रिय ठिकाण आहे जिथे पहिल्या विक्रमशाह, हे ठिकाण सर्वात उंच टेकडीच्या शिखरावर आहे. येथून आपल्याला संपूर्ण दरी देखील पाहता येईल. शिरपामाळ वर जने हा एक आनंददायक आणि थरारक अनुभव आहे. शिरपामाळचे निसर्गरम्य, मोहक स्थान पर्यटकांना खूपच आकर्षित करते.

8) Bhopatgad fort jawhar | भोपतगड किल्ला

छत्रपती शिवाजींनी बांधलेला jawhar taluka मधील हा किल्ला इतर किल्ल्यांच्या तुलनेने लहान आहे. किल्ल्याला गडद आतील चेंबर आहेत. एका जीर्ण खडकापासून कोरलेले असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर त्याच्या वैयक्तिक आणि काही अधिकृत बैठका आयोजित करण्यासाठी केला.

एक दिवसाच्या ट्रेकिंग अनुभवासाठी एक परिपूर्ण ठिकाण म्हणून भोपातगड चा उल्लेख करता येईल, Bhopatgad Fort हा निसर्गरम्य परिसराने परिपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात समाविष्ट केल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

भोपतगडचा उपयोग टेहळणी किवा निगराणी बुरूज म्हणून करण्यात येत असे. किल्ल्यावरील अवशेष राजवाड्याची उपस्थिती दर्शवतात.भोपतगड किल्ल्यात प्रवेश करताच तुम्हाला म्हसोबा मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती दिसेल. मध्यभागी एक लहान तलाव आणि पाण्याची टाकी देखील आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगलांनी हा किल्ला जिंकला.

हा किल्ला एक सोपा ट्रेकिंग अनुभवासाठी खूप चांगला आहे कारण जास्त खडतर चढाई नसल्यामुळे कारण हा एक सोपा ट्रेक आहे आणि पायथ्यापासून वर जाण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो. तथापि, किल्ल्यावरून आपल्याला पाहायला मिळणाऱ्या आजूबाजूची वातावरण सौंदर्यपूर्ण व मनमोहक आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या किल्ल्याला भेट देण्याची ओढ ही शिवाजी महाराजांचं नाव ऐकून जास्तच वाढते.

Culture of Jawhar | जव्हारची संस्कृती

जव्हारची संस्कृतीसाठी ज्यात वारली चित्रकला तसेच विविध पारंपारिक संस्कृती जसे जव्हारचा बोहाडा तसेच तारपा नृत्य व वारली चित्रकला अश्या कलासंस्कृती पाहण्यास मिळते जी जव्हार करांनी प्राचीन काळापासून जपली आहे.

Conclusion

jawhar taluka हे पालघर मधील सर्वात जुना इतिहास लाभेलेले आणि सोबत निसर्गाचा वारसा लाभलेले शहर आहे. जव्हार मधील एवढ्या प्रकारची ही पर्यटन स्थळे यामुळे या ठिकाणी हजारो पर्यटक वर्षभर या ठिकाणांना पर्यटन साठी भेट देत असतात.

तरीही मुळात पावसाळ्यात येथील निसर्गसृष्टी बहरते त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक हे येथे येण्यासाठी पावसाळा ऋतूच पसंत करतात कारण पावसाळ्यात आपल्याला येथे अनेक धबधबे (Jawhar waterfall) पाहायला मिळतील. आणि पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरते यामुळे ही ठिकाणे आणखी खुलून दिसतात.

FAQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: